कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निकालांनंतर हिंसक घटना समोर येत आहेत. नंदीग्रामच्या जागेवर जागा ममता बॅनर्जी यांना पराभव पत्कारावा लागला आहे.  भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीवर TMC कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. हा हल्ला हल्दियामध्ये काउंटिंग सेंटरमधून निघतांना केला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बंगालमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे हे हाल असतील, तर सर्व सामान्य जनतेचे काय हाल असतील? टीएमसी बंगालमध्ये भयाचं वातावरण बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज हल्दियामध्ये गाडीवर दगडफेक केली गेली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या,' असं सुवेंदू यांनी म्हटलं आहे.


बंगालच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. 2 टर्मपासून सत्ता असलेल्या टीएमसीला जनतेने पुन्हा संधी दिली आहे. 200 पेक्षा जास्त जागा जिंकत टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे.


दुसरीकडे, भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत पक्षाला 77 जागा मिळवता आल्या.