नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. कधी खासदाराचं भाषण गाजल्याचे व्हिडिओ समोर येत असतात, तर कधी आमदारांच्या आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र या घटनेत एक वेगळाच व्हि़डिओ व्हायरल होत आहे. अधिवेशनात महागाईच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना एका महिला खासदाराने बॅग लपवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळी अधिवेशनात महागाईसह इतर मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत. सोमवारी महागाईवर वादळी चर्चा सुरु होती. विरोधी पक्षाचे खासदार सरकारवर आरोपांचे रान उठवत होते. या दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा लुई व्हिटॉन बॅग लपवताना दिसल्या आहेत. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.  


व्हिडिओत काय? 


सोमवारी संसदेच्या अधिवेशनात तृणमूलच्या काकोली घोष हस्तकलेच्या महागाईवर बोलत होत्या. यावेळी तिच्या शेजारी बसलेल्या महुआ मोईत्रा त्यांची लुई व्हिटॉन बॅग सीटवरून पायाजवळच्या टेबलाखाली हलवताना कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.  



बॅगेची किंमत किती? 
एका अहवालानुसार, महुआ मोईत्रा आणलेली ही बॅग लुई व्हिटॉनची होती. या बॅगेची किंमत 1.5 लाख रुपये आहे. दरम्यान बॅग लपवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यामुळे दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या तृणमूलचे खासदार एवढी महागडी बॅग कशी बाळगू शकतात, असा सवाल विचारला जात आहे.  तसेच महागाईवरून केंद्रावर निशाणा साधणारा तृणमूल काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी संसदेत एवढी महागडी पिशवी कशी घेऊन जातात असाही सवाल केला जात आहे.  


दरम्यान संसदेत महागाई सारख्या ज्वलंत विषयावर चर्चा सुरु असताना महुआ मोईत्राची ब्रॅंडेड बॅग लपवण्याची कृती अनेकांना पचली नाहीए.