नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. जेव्हा वास्तव स्वप्नापेक्षा अधिक सुंदर असतं, अशी कॅप्शनही नुसरत यांनी फोटोखाली लिहली आहे. तसेच नुसरत यांनी या पोस्टमध्ये त्यांचा प्रियकराच्या नावाचाही @nikhiljain09 उल्लेख केला आहे. तर निखिल जैन यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जहाँ यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून तृणमूलच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावूनही नुसरत यांनी तीन लाख ५० हजार ३६९ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नुसरत यांची ओळख आहे. 


विश्वास बसत नाही ना; या आहेत लोकसभेच्या नव्या खासदार


कोलकातातील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन स्कूल'मधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भवानीपूर कॉलेजमधून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली. २०११ साली 'शोत्रू' या बंगाली चित्रपटातून नुसरत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिने केलेल्या कामाची अनेकांकडून प्रशंसा करण्यात आली होती. याशिवाय, 'बोलो दुर्गा माई की', 'हर हर ब्‍योमकेश', 'जमाई ४२०' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.