विश्वास बसत नाही ना; या आहेत लोकसभेच्या नव्या खासदार

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. कलाविश्वातील अनेक कलाकाराही लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले होते. यापैकीच एक उमेदवार म्हणजे अभिनेत्री नुसरत जहा. पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून नुसरतने निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख ५० हजार ३६९ मतांनी विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर नुसरतचे फोटो व्हायरल होत आहेत.

May 24, 2019, 14:40 PM IST
1/5

नुसरतचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये ८ जानेवारी १९९० मध्ये झाला. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नुसरतची ओळख आहे. कोलकातातील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन स्कूल'मधून तिने सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर भवानीपूर कॉलेजमधून तिने बी.कॉमची पदवी घेतली आहे.

2/5

नुसरत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरुन अॅक्टिव्ह असते. नुसरत नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते.

3/5

नुसरतने २०११ साली बंगाली चित्रपट 'शोत्रू'मधून आपल्या चित्रपटसृष्टीतील करियरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिने केलेल्या कामाची अनेकांकडून प्रशंसा करण्यात आली होती.

4/5

कोलकातामध्ये राहणाऱ्या नुसरतने आपल्या छोट्याशा चित्रपट करियरमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे.

5/5

मॉडेल असलेल्या नुसरत जहाने 'बोलो दुर्गा माई की', 'हर हर ब्‍योमकेश', 'जमाई 420' यांसारख्या चित्रपटांतून काम केलं आहे.