कोलकाता : भाजप आणि तृणमूल काँग्रसेचा प्रचारादरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रोड शो दरम्यान दगडफेक झाली. ही दगडफेक  तृणमूल काँग्रसे काँग्रेसकडून करण्यात आली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर जाळपोळीचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना हा सर्व प्रकार रोखण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. कॉलेज स्ट्रीट मार्गावर कोलकात्ता विद्यापीठाजवळून शाह यांचा रोड शो जात असताना भाजप आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शोला राड्याचे स्वरुप प्राप्त झाले.



दोन्ही बाजुकडील कार्यकर्ते भिडल्याने येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अमित शाह यांच्या ट्रकच्या दिशेने काठ्या फेकण्यात आल्यानंतर या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झाला. रस्त्यावर एकच पळापळ सुरु असल्याचे चित्र होते. त्याचवेळी रस्त्यावर जाळपोळीच्याही घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठिण झाल्याचे पाहायला मिळाले.



तणावाची परिस्थिती असताना अमित शाह यांनी रोड शोला सुरुवात केली. त्यामुळे अधिकच तणाव वाढला. इथे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले मोदी-शाहांची पोस्टर्स तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हटवली. त्यामुळे टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे दिसून आले. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या प्रकाराला तृणमुलचे कार्यकर्ते आणि पोलीस जबाबदार आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याला भाजपच जबाबदार असल्याचा प्रतिआरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे. तणाव असताना रोड शो का काढण्याचा प्रयत्न केला, असा सवालही उपस्थित केला आहे.