Gold Silver Price Today :  सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वेग पाहायला मिळत आहे. तसेच सोन्याच्या (gold Rate) किमती ही नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) विक्रमी वाढ झाली होती. ही वाढ कायम असून गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावाने 60 हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एक नवा विक्रम नोंदवला आहे. आज सोन्याचे दर 61 हजार रुपयांवर तर चांदीचा भाव 78 हजारांवर गेला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोन्याचे दरात तेजी दिसून आली असून सोन्यामध्ये 110 रुपयांची वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,600 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 61,750 रुपये आहे. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रुपये असणार आहे. एकंदरीत सोने पुन्हा महागले असून चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.  


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चमकले


सोन्याच्या दराने देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वेग पकडला आहे. येथे सोन्याने 13 महिन्यांचा उच्चांक $2040 प्रति औंस ओलांडला असून चांदी देखील भाव $25 च्या वर आहे. जो एक वर्षाचा उच्चांक आहे. मार्च 2022 नंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदा सोने प्रति औंस $2,000 वर बंद झाले. सोन्याने ऑगस्ट 2020 मध्ये $2,075.47 प्रति औंस हा सार्वकालिक उच्चांक राहिला आहे. अशा स्थितीत आर्थिक आकडेवारीने शक्य तितकी साथ देत राहिल्यास सोन्याच्या विक्रमाचा कायापालट होऊ शकतो.


22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय


24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोने किंवा तांबे, चांदी, जस्त इत्यादी 9% इतर धातू मिसळून दागिने तयार करतात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


हॉलमार्क पाहून सोने खरेदी करा


लोकांनी सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ताची काळजी घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करा. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क सेट करते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांद्वारे नियंत्रित केली जाते. 


आजचे दर चेक करा


22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंत तुम्हाला काही क्षणातच एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच सतत अपडेट्ससाठी तुम्ही IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.