Gold-Silver Price : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी; सोन्याच्या किमतीत `इतक्या` रूपयांनी घसरण
दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
Today Gold Silver Rate : दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
सोने-चांदी किती स्वस्त झाले?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांनी घसरून 50,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी, चांदीचा भाव 0.10 टक्क्यांनी घसरून 57691 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा स्पॉट किमती आज 0.61 टक्क्यांनी घसरून $1,651.13 प्रति औंस झाला. त्याच वेळी, चांदीचा भाव येथे 0.94 टक्क्यांनी घसरून आज 19.1929 डॉलर प्रति औंस झाला आहे.
सोन्याची शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क (hallmark) पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. 'बीआयएस केअर अॅप'च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की बनावट हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.
वाचा : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
दर तपासा
घर बसल्याही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.