Gold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?
Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...
Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या (gold price) दरात तेजी दिसून आली तर दिवसाअखेर सोने घसरल्याचेही दिसून आले. आज सुद्धा सोने चांदीच्या दरात काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी घसरण दिसून येत आहे. सोन्या चांदीच्या (gold silver price) कालच्या दराच्या तुलने आजचे दर थोडे जास्त असल्याचे दिसून येते. (gold silver price update 28 october 2022)
आज (29 ऑक्टोबर) सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,930 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,330 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 637 रुपये आहे. गुड रिटर्न्स (Good returns) या वेबसाइटनुसार चांदी 58,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
वाचा : अचानक हाता पायाला मुंग्या येतात? आजच सावध व्हा!
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,100 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,380 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 47,130 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,310 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 581 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई - 51,750 रुपये
दिल्ली - 51,520 रुपये
हैदराबाद - 51,370 रुपये
कोलकत्ता - 51,370 रुपये
लखनऊ - 51,520 रुपये
मुंबई - 51,370 रुपये
नागपूर - 51,300 रुपये
पुणे - 51,300 रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (Indian Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हॉलमार्क (Hallmark)
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.