World Stroke Day: साखर आणि मिठाचे अतिसेवन करण्यापूर्वी ही बातमी वाचा!

Brain Stroke Symptoms: जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.   

Updated: Oct 29, 2022, 11:35 AM IST
World Stroke Day: साखर आणि मिठाचे अतिसेवन करण्यापूर्वी ही बातमी वाचा!  title=

World Stroke Day: कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes), हृदयविकार (Heart disease) यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा (Brain stroke) उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघात (स्ट्रोक) ला आमंत्रण मिळत आहे. जागतिक  स्ट्रोक (Stroke Problem) दिनाच्या निमित्ताने या आजाराला (Stroke Symptoms) कसं दूर ठेवता येऊ शकतं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.  

‘स्ट्रोक’ येणं म्हणजे काय?

स्ट्रोक (Stroke) हा एक गंभीर स्वरूपाचा आजार असून याला पक्षाघात किंवा लकवा देखील म्हटले जाते. या आजारा प्रामुख्याने हृदय आणि मेंदूशी जोडला जातो. मात्र, व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागात स्ट्रोक येऊ शकतो. मेंदूतील स्ट्रोकला ब्रेन स्ट्रोक (Brain stroke)  म्हणतात. या स्थितीत मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यात अडचण निर्माण होत मेंदूच्या पेशी मरण पावतात. या आजारामुळे शरीराचा एखादा अवयव अचानक काम करणे बंद करतो. त्याला स्ट्रोक येणे असे म्हटले जाते.

शरीरच्या काही भागांना मुंग्या येणे

स्ट्रोकचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर किंवा पायांवर अर्धवट अर्धांगवायूचा अनुभव येऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये ते शरीराच्या एका बाजूला दिसून येते. हे ओळखण्यासाठी, रुग्णाला त्याचा/तिचा हात/पाय वर करण्यास किंवा हसण्यास सांगितले जाते. 

गंभीर डोकेदुखी

काही कारण नसताना असह्य डोकेदुखी हे एक महत्त्वाचे लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. मनात काहीतरी चुकीचं असल्याचं हे पहिलं लक्षण आहे. स्ट्रोक नंतर पुनर्प्राप्तीसाठी वैद्यकीय तज्ञांचा (medical experts) वेळेवर हस्तक्षेप महत्वाचा आहे. मिनी-स्ट्रोक आणि त्यांची लक्षणे कमी लेखणे आणि स्ट्रोकची आणखी वाईट प्रकरणे घडवून आणणे सामान्य आहे. स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूक आणि सक्रिय असणे आणि नियमित चाचण्या घेणे सर्वोत्तम उपचारांसाठी आवश्यक आहे.

वाचा : Social Media युजर्सना आता थेट सरकारकडे Twitter, Facebook संबंधित तक्रार करता येणार, कसं ते जाणून घ्या

चुकीच्या पद्धतीने अंघोळ करणे ठरू शकते घातक

अंघोळ करण्याची चुकीची पद्धत देखील स्ट्रोक (Stroke)  येण्यास कारणीभूत ठरू शकते. अंघोळ करताना जवळपास सर्वजण आधी डोक्यावर पाणी घेता. मात्र, ही चुकीची सवय आहे. यामुळे स्ट्रोक सह इतर आजार ही निर्माण होऊ शकतो. कारण शरीरातील रक्ताचा प्रवाह वरपासून खालपर्यंत असतो. अंघोळ करताना जर थेट डोक्यावर थंड पाणी ओतले तर मेंदूतील रक्त वाहिन्या आकुंचन पावण्यास सुरुवात होते. यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होतात. अशावेळी हृदय वेगाने रक्त वर पाठवतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूची रक्तवाहिनी फुटू शकते. 

साखर आणि मिठाचे अतिसेवन टाळा

मधुमेह, कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या रुग्णाला हृदया संबंधित आजारासह पक्षाघाताची शक्यता असते. यासह जे लोक जास्त साखर, मीठ आणि तळलेले पदार्थ खातात त्यांना स्ट्रोकचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे साखर आणि मिठाचे अतिसेवन टाळले पाहिजे.

करा हे उपाय

- आहारात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
- आल्याचे सेवन करा. कारण ते रक्त पातळ करण्यास मदत करते.
- दिवसभर जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ सेवन करावे.
- हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
- आहारात मीठ आणि चरबी युक्त पदार्थांचे प्रमाण कमी करा.
- मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
- रक्तदाब हे देखील ब्रेन स्ट्रोकचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे नियमितपणे रक्तदाब तपासणी करत वैद्यकीय सल्ला घ्यावा.

 

 

(टीप : वरील दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)