Today Gold Silver Price :  जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज देखील सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांच्या वेगाने वाढला आहे.  तर चांदीचे दर आज एमसीएक्सवर 0.16 टक्क्यांनी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,830 रुपये आहे.   


 मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 48,538


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538


1 किलो चांदीचा दर - 62,830


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538


1 किलो चांदीचा दर - 62,830


वाचा : घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना Shoaib Malik सानियासोबत फोटो शेअर करत का म्हणतोय, 'आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य...' 


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538


1 किलो चांदीचा दर - 62,830


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,900


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,492


1 किलो चांदीचा दर - 62,740 


आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत किती आहे?


आता जागतिक बाजाराबद्दल बोलूया, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. कालच्या व्यवहारादरम्यान दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली असली तरी आज ते तेजीचे ट्रेंड दाखवत आहेत. मंगळवारी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर चांदीची किंमतही 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे.