Petrol-Diesel Price Today:  गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. मात्र गुरुवारी संध्याकाळी कच्च्या तेलाच्या दरात किंचित वाढ झाली. मात्र, असे असूनही कच्च्या तेलाचा दर गेल्या 9 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price)  दरात कोणताही बदल झालेला नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WTI क्रूडचा नवा दर किरकोळ वाढून 81.42 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड 88.51 डॉलर प्रति बॅरल आहे. महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरांत 3 रुपयांनी कपात करण्यात आली होती. 


भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले जातात. आजच्या दरांनुसार, देशातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांतही गेल्या कित्येत दिवसांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


देशातील महानगरांतील किमती काय? 


शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये

 या भागात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल


महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल (petrol diesel rate) परभणी जिल्ह्यात विकलं जात असून पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. 


वाचा : 5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.