Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूड 95 डॉलर प्रति बॅरलच्या खाली असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दीर्घकाळ स्थिर ठेवल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आज 17 ऑक्टोबरलाही पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना भारतीय तेल कंपन्या त्यांच्या जुन्या तोट्यामुळे दीर्घकाळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत नाहीत. याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वत: गेल्या महिन्यात दिली होती.


भारतीय पेट्रोलियम कंपनी IOCL नुसार, दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोलची किंमत 97.18 रुपये आणि डिझेलची किंमत 90.05 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर आहे.


प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर...


नोएडा


पेट्रोल - 96.57 रुपये प्रति लिटर
डिझेल - 89.96 रुपये प्रति लिटर


जयपूर


पेट्रोल - 108.48 रुपये प्रति लिटर
डिझेल - 93.72 रुपये प्रति लिटर


अजमेर


पेट्रोल - 108.43 रुपये प्रति लिटर
डिझेल - 93.67 रुपये प्रति लिटर


भोपाळ


पेट्रोल - 108.65 रुपये प्रति लिटर
डिझेल - 93.90 रुपये प्रति लिटर


महानगरांमध्ये पेट्रोलचे दर किती?


देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये आज 17 ऑक्टोबरलाही पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर कधीपासून बदलले नाहीत?


भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बराच काळ बदल झालेला नाही. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी आणि डिझेलवरील 8 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून आजतागायत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत म्हणजेच किमती तशाच आहेत.