Petrol-Diesel Price on 24 September 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent crude oil) सध्या प्रति बॅरल $86 च्या आसपास आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची (WTI Crude) किंमत प्रति बॅरल $ 78 वर पोहोचली. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात कोणताही फरक पडलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 4 महिन्यांपासून स्थिर आहेत. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.


पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत इतकी घसरण अनेक महिन्यांनंतर पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) कमी होतील, असे मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


तुमच्या शहराची किंमत काय आहे?


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर