Petrol Diesel Price Today : 2022 हे वर्ष संपण्यासाठी आजचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे. याचपार्श्वभूमीवर या शेवटच्या आठवड्यात पेट्रोल- डिझेलचे दर (petrol diesel rate) स्वस्त झाले की महाग याबद्दल जाणून घेऊया. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  परिणामी आजचे (26 डिसेंबर) पेट्रोल आणि डिझेलच्या (today petrol diesel price) किंमतींचे ताजे अपडेट्स देशातील तेल विपणन कंपन्यांनी आजचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता (petrol diesel latest price marathi) सारख्या देशातील महानगरांसाठी नवीनतम किंमती अद्यतनित केल्या आहेत.


आजचे पेट्रोल- डिझेलचे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील तेल विपणन कंपन्या (OMCs) ने आज (26 डिसेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.


या शहरांमध्ये तेलाचे दर


शहरातील  पेट्रोल  डिझेल
मुंबई  106.31  94.27
दिल्ली  96.72  89.62
चेन्नई  102.63  94.24
कोलकाता  106.03  92.76
बंगलोर  101.94  87.89
लखनौ  96.57  89.76
नोएडा  96.79  89.96
गुरुग्राम  97.18  90.05
चंदीगड  96.20  84.26
पाटणा  107.24  94.04


सकाळी 6 वाजता किमती अपडेट 


पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (today petrol diesel price) बदलल्यास 6 वाजता अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागात पडण्याचे कारण आहे.


वाचा : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद 


एसएमएसद्वारे चेक करा दर  


एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 वर आरएसपी एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPprice पाठवून देखील शोधू शकतात.