कच्च्या तेलाच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत आहे. गेल्या दिवशी 90 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर गेलेले क्रूड आता 100 डॉलरच्या पुढे गेले आहे.
Today Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 90 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर गेलेले क्रूड आता 100 डॉलरच्या पुढे गेले आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत. मेघालय आणि महाराष्ट्र वगळता सर्व राज्यांमध्ये तीन महिन्यांपूर्वी पेट्रोलच्या दरात बदल करण्यात आला होता.
क्रूडने $100 ओलांडले
22 मे रोजी केंद्र सरकारने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. मात्र मंगळवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 96.77 वर पोहोचली. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $104.7 वर दिसले. गुरुवारीच मेघालय सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे दीड रुपयांची वाढ केली आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे सरकारने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करून दिलासा दिला होता. यापूर्वी 22 मे रोजी मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोल 8 रुपयांनी तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर