मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य शेअरमध्ये पैसा गुंतवून तुम्हाला मोठा नफा कमावता येतो. परंतु त्यासाठी गरजेचे आहे. शेअर्सची निवड. त्या शेअरचा अभ्यास/संशोधन महत्वाचे आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर, आम्ही तुमच्यासाठी स्वस्त आणि चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवणारा शेअर घेऊन आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज कोठारी पेट्रोकेमिकलचे ( Kothari Petrochemicals) शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. संदीप जैन यांनी म्हटले की, हा शेअर HC Kothari Group चा भाग आहे. कंपनी देशातील सर्वात मोठी Polyisobutylene बनवणारी कंपनी आहे. 1990 पासून ही कंपनी काम करीत आहे. 


Kothari Petrochemicals - Buy call
CMP - 54.70
Target - 60


कंपनीचा परफॉमन्स
कंपनीची मार्केट कॅप 300 कोटींच्या आसपास आहे. रिटर्न ऑन इक्विटी 21 टक्के आहे.  सर्वात चांगली बाब म्हणजे यामध्ये कंपनीच्या प्रमोटर्सची शेअर होल्डिंग्स 71 टक्के आहे. ही झिरो डेट कंपनी आहे. म्हणजेच कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.


कंपनीचे मागील 4 तिमाहीचे निकाल शानदार आहेत. या वर्षाच्या जून तिमाहीमध्ये कंपनीने 7 कोटींचा नफा मिळवला होता.