मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा आणि एकंदर हे संकट आता सोबतच घेऊन जगण्याची तयारी दाखवत अनेक गोष्टी पुर्वपदावर येऊ लागल्या आहेत. सराफा बाजारांवरही याचा थेट परिणाम झाल्याचं दिसत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये येऊ घातलेले सणासुदीचे दिवस आणि कोरोनाचं संकट असं चित्र असतानाही सोन्या- चांदीच्या दरांना हळूहळू उसळी मिळताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त दरच नव्हे, तर सोन्या- चांदीची मागणीही ओघाओघानं वाढल्याचं दिसून आलं. पण, सध्या मात्र या दरांमध्ये काही अंशी कपात होताना दिसत आहे. द इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार ग्लोबल ट्रेंडनुसार Gold futures on MCXमध्ये सोन्याचे दर तीनशे रुपयांनी कमी दिसले. परिणामी दहा ग्रॅमसाठी हे दर 50,807 वर पोहोचले. तर, चांदी 833रुपयांनी घसरली. ज्यामुळं हे दर प्रति किलोमागे 62,265वर पोहोचले. 


 


दरम्यान, सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही सणांची पार्श्वभूमी पाहता सराफा बाजाराता झळाळी मिळण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दिवसांमध्ये याच पार्श्वभूमीवर आता सोन्या- चांदीचे दर सर्वसामान्यांना काहीसे परवडणार की वधारत सर्वांना धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.