नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी उच्चांक गाठतील अशी शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे. सध्या ५० हजार ते ५२ हजार रूपयांच्या घरात असलेल्या सोन्याचे दर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ६७ हजारांवर जाण्याची शक्यता विश्लेषकांनी नोंदवीली आहे. रिसर्च फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या एका अहवालात असे मूल्यांकन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहवालानुसार, केंद्रीय बँकांचे व्याज स्वस्त ठेवण्याच्या धोरणामुळे आणि वर्षाच्या अखेरीस पारंपारिक खरेदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येईल. लोकांना सोन्यात गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजारापेक्षा चांगले उत्पन्न मिळाले आहे.


विजयादशमी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कमी झाले. मात्र लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात ४०० रूपयांनी वाढ होवून ५१ हजार ५०० रूपये प्रती तोळा तर चांदीच्या भावात देखील १ हजार रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव ६४ हजार ५०० रूपयांवर पोहोचले आहेत. 


सध्या सर्वत्र दिवाळी आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न साराईची धामधूम पाहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस सोने-चांदीची खरेदी कायम राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र लग्नसराईच्या काळात म्हणजेच  डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सोन्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.