श्रीहरिकोटा : इस्रो आज जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रक्षेपकाद्वारे भविष्यात भारतीय अंतराळवीरांना भारतातूनच अंतराळात पाठवणं शक्य होणार आहे. भारताला 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे संपर्कयंत्रणा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परदेशी जावं लागत होतं. जीसएसएलव्ही मार्क-3 मुळे आता आपल्याचा चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवणं शक्य होणार आहे. 


यामुळे भारत याक्षेत्रात स्वयंपूर्ण होईल तसंच परदेशी ग्राहकांनाही भारत आपल्याकडे आकर्शीत करु शकणार आहे..  भारताचे आतापर्यंतचे सर्वात जास्त वजनदार अशा जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क-3 अर्थात जीएसएलव्ही एमके-3 या उपग्रह प्रक्षेपकाचे वजन पाच पूर्ण भरलेल्या जंबोजेट विमानांइतके आहे.



सध्या या प्रक्षेपकानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलयं.. कारण या द्वारे सोडण्यात येणा-या जीसॅट-19 उपग्रहाद्वारे माहिती संपर्क तंत्रज्ञानात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे डिजिटल इंडियाला पाठबळ मिळेल आणि अधिक वेगवान इंटरनेट सेवा मिळू शकेल. जीसॅट-19 या उपग्रहाचं वजन 3 हजार 136 किलो इतकं आहे.