जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे आजचे दर
पेट्रोल-डिझेलच्या दरांत रोज बदल होत असतात.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरांत रोज बदल होत असतात. मात्र एक दिवसाच्या कापातीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. देशाची राजधानी दिल्लीसह सर्वच शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. गुरूवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ९ पैसे प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ११ पैसे प्रति लिटरनुसार कपात केली होती. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर ८१.९९ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७३. ०५ रूपये प्रति लिटर आहे.
पेट्रोलचे दर
दिल्ली - ८१.९९
मुंबई - ८८.६४
चेन्नई - ८४.९६
कोलकाता - ८३.४९
डिझेलचे दर
दिल्ली - ७३.०५
मुंबई - ७९.५७
चेन्नई - ७८.३८
कोलकाता - ७६.५५
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.