नवी दिल्ली : सध्या बाजारात किलोला शंभरी गाठलेले टोमॅटोचे दर पुढील १५ दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटोची आवक वाढणाऱ असल्याने दर कमी होणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.


सध्या बाजारात टोमॅटोचे दर प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचलेत. आवक घटल्याने त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर झालाय. २९ जूनला कोलकातामध्ये टोमॅटोचे दर ९५ रुपये प्रति किलो आहेत तर दिल्लीत ९२ रुपये किलो, मुंबईत ८० रुपये किलो टोमॅटो तर चेन्नईत ५५ रुपये किलोंनी टोमॅटोची विक्री केली जात होती.