आजच्या आधुनिक काळात सर्वचजण इंटरनेटचे महत्त्व जाणतात. जगभरात इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात सुद्धा मोबाईल इंटरनेटचा वापर सर्वांसाठी सोयीचं झाला आहे. मोबाईल इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. परंतु, वेगवेगळ्या देशात मोबाईल इंटरनेटच्या वेगात अंतर पाहायला मिळते, म्हणजेच प्रत्येक देशात मोबाईल इंटरनेटचा वेग हा एकसारखा नसतो. मध्य पूर्व आणि एशियातील बऱ्याच देशात मोबाईल इंटरनेटचा वेग हा अधिक आहे तसेच यूएई, कतार सारख्या देशात सुद्धा इंटरनेट जास्त वेगाने चालते. याउलट अमेरिका आणि आपल्या भारतात मात्र इंटरनेटचा वेग हा कमी आहे. या देशांमध्ये अजुनसुद्धा वेगवान इंटरनेटची समस्या आहे. आजही अमेरिका आणि भारतासारख्या इंटरनेटच्या सुविधांचा आभाव पाहायला मिळतो. 


 

यूएई आहे सर्वात पुढे


 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स' नुसार पूर्व मध्य आणि एशियातील देशांमध्ये वेगवान मोबाईल इंटरनेट चालते. यापैकी संयुक्त अरब अमिरात (युएई) हा मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत पूर्ण जगात सर्वात पुढे आहे. दुबई मध्ये मोबाईल इंटरनेटचा वेग हा जवळपास 100 पट वाढला आहे. 2012 पासून युएईने डिजिटल इन्फ्रास्ट्रकचरमध्ये अधिक प्रमाणात पैशांची गुंतवणूक केल्याने या देशात सर्वात वेगवान इंटरनेट आहे. 


 

क्रमांक  देश MBPS
1 संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates)  442
2 कतार (Quatar) 358 
3 कुवेत (Kuwait) 264
4 बल्गेरीया (Bulgaria)  172
5 डेनमार्क (Denmark)  162 
6 दक्षिण कोरिया (South Korea) 148 
7 नेदरलँड (Netherlands) 147 
8 नॉर्वे (Norway)     145.74 
9 चीन (China)  139.58 
10 लक्झेंबर्ग (Luxembourg)  134.14

 


जगभरात चीन नंतर भारतात दुसऱ्या क्रमांकाचे ऑनलाईन मार्केट आहे. भारतात 900 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरतात. भारतात इंटरनेटचा इतका जास्त वापर असून सुद्धा इंटरनेचा वेग हा इतर देशांच्या तुलनेत काहीसा कमी प्रमाणात असलेला दिसून येतो. भारतात इंटरनेटचा वेग हा जवळपास जगाच्या तुलनेत 50 टक्क्याहून अधिक कमी आहे. नोव्हेंबर 2024 नुसार स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स मध्ये जगभरात भारत हा मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत 25व्या क्रमांकावर आहे. भारतात सरासरी डाऊनलोड स्पीड ही 100.78 Mbps, अपलोड स्पीड 9.08 Mbps तसेच लेटेंसी ही 30 ms इतकी आहे. भारतात इंटरनेटचा वेग जरी कालांतराने वाढताना दिसत असला तरी तो कित्येक विकसित देशांच्या तुलनेत मागे आहे. भारत हा इन्फ्रास्ट्रकरशी निगडीत बऱ्याच आव्हानांना सामोरे जात असल्याकारणाने डिजिटल वेग मंदावलेला पाहायला मिळतो. 


 

यावरुन कळते की जगभरात इंटरनेटचा वापर वाढत आहे. विशेषत: मोबाईल इंटरनेटच्या वापरामुळे माणूस जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या माणसाशी संवाद साधू शकतो यामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. जगभरात स्मार्टफोन आणि मोबाईल द्वारे मोबाईल इंटरनेच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. जगभरातील असंख्य लोक मोबाईल इंटरनेटचा वापर करत देशाचा डिजिटल विकास साधण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.