Battery Killer Apps : सावधान! हे 20 Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डिलीट करा, काय कारण? जाणून घ्या
Top 20 Apps That Drain Battery : हे APP खातात तुमच्या फोनची सर्वात जास्त बॅटरी, पाहा तुम्ही वापरत असलेलं APP यामध्ये आहे का?
Top 20 Battery Killer Apps : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आता स्मार्टफोनवरून सर्व काही करता येते आणि प्रत्येक गोष्टीसाठी अॅप आहे. फोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोरेज आणि बॅटरी. अधिक अॅप्समुळे, स्टोरेज आणि बॅटरी लवकर संपते. pcloud ने एक रिपोर्ट शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी अशा 20 अॅप्सबद्दल सांगितले आहे जे आपल्या फोनच्या बॅटरीचे शत्रू आहेत. यात अनेक डेटिंग अॅप्स देखील आहेत. जाणून घेऊया...
या अॅप्सना सर्वाधिक मागणी आहे
फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि लिंक्डइन 11 अतिरिक्त वैशिष्ट्यांना पार्श्वभूमीमध्ये कार्य करण्यास अनुमती देतात. जसे की फोटो, वायफाय, स्थान आणि मायक्रोफोन. या अॅप्सना चालण्यासाठी जास्त बॅटरी लागते. या सर्वांपैकी फक्त इंस्टाग्राममध्ये डार्क मोडचा पर्याय आहे.
ऑनलाइन डेटिंग अॅप्स देखील खूप बॅटरी खातात
pcloud द्वारे केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की ऑनलाइन डेटिंग अॅप्समुळे तुमच्या फोनची बॅटरी खूप लवकर संपते. टिंडर, बंबल आणि ग्राइंडर सारखी ऑनलाइन डेटिंग अॅप्स 15% टॉप किलर अॅप्स बनवतात. सरासरी 11 वैशिष्ट्ये बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. तिन्ही डेटिंग अॅप्समध्ये डार्क मोड उपलब्ध नाही आणि त्यामुळे ते वापरताना जास्त ऊर्जा लागते ज्यामुळे बॅटरी लवकर संपते.
वाचा : तुम्ही देखील WhatsApp चं हे वर्जन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
हे 20 अॅप्स सर्वाधिक बॅटरी शोषून घेतात
अभ्यासात असे 100 अॅप्स निवडण्यात आले होते जे खूप वापरले जातात. त्यापैकी 20 अॅप्स अधिक बॅटरी शोषणारे आहेत.
हे आहेत 20 अॅप्स : Fitbit, Verizon, Uber, Skype, Facebook, Airbnb, Bigo Live, Instagram, Tinder, Bumble, Snapchat, WhatsApp, Zoom, YouTube, Booking.com, Amazon, Telegram, Grinder, Like आणि LinkedIn आहेत.