मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, एकदा का मित्र एकत्र भेटले आणि ते मस्तीच्या मुडमध्ये असतील, तर मग काही खरं नाही. मित्र मस्करी-मस्करीत अशा अनेक गोष्टी करतात किंवा दुसऱ्याला करायला लावतात याचा काही नेम नाही. अशीच घटना एका महिलेसोबत घडली आहे. आपल्या मित्रांमुळे ही महिला चर्चेचा विषय बनली. खेळाच्या मैदानावर जिथे खेळाडूंमध्ये जल्लोष आणि उत्साह असतो, त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते. ज्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी त्यांचे चाहाते काहीही करायला तयार होतात. ज्यामुळे ते चर्चेचा विषय ठरतात. आता असाच प्रकार या महिलेसोबत घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका सामन्यादरम्यान विचित्र घटना घडली. जिथे एक महिला फॅन टॉपलेस होऊन मैदानात आली, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. जावोन जोहानसन असे महिलेचे नाव आहे.


गोल्ड कोस्ट टायटन्स आणि पॅरामटा ईल्स यांच्यात सामना सुरू होता. त्यानंतर एक महिला टॉपलेस होऊन स्टँडवरून थेट ग्राउंडवर पोहोचली, ज्यामुळे  स्टेडियममध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहे, तशीच ही महिला देखील सर्वत्र प्रसिद्ध झाली.



परंतु ही टॉपलेस महिला जाव्हॉन जोहान्सनला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने मैदानातून बाहेर काढले, त्यावरून सोशल मीडियावरही वेगळीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी या कारवाईला चुकीचे म्हटले, तर काहींनी महिलेवर आरोप केले आहेत.


जाव्हॉन जोहानसनच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्रांनी तिला डेअर दिले होते. ज्यामुळे ती स्टेडिअमवर आपला टॉप काढून आली होती. पुढे तिने लोकांना याबाबत सांगितले की, मी केलेल्या कृत्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. तो फक्त मनोरंजनाचा एक भाग होता. या महिलेने टॉपलेस होण्यापूर्वी स्टँडवरून व्हिडीओही बनवला होता.