गुंगीमिश्रीत पदार्थ देवून परदेसी पर्यटकाला लुटले....
पंतप्रधानांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये एका परदेसी पर्यटकासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाराणसी : पंतप्रधानांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये एका परदेसी पर्यटकासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे भारताची प्रतिमा पर्यटकांसोबत मलीन होण्यास मदत झाली आहे.
काय झाले नेमके ?
त्याचे झाले असे. एक जपानी पर्यटक भारतात फिरण्यासाठी आला होता. तो वाराणसीत फिरत असताना गाईडने त्याला गुंगीमिश्रित पदार्थ खायला देवून त्याला लुटले. त्याचा कॅमेरा, पासपोर्ट आणि त्याच्या जवळची रक्कम सारं काही चोरलं. याप्रकरणी पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे.
काय-काय लुटले ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जपानी नागरिक भारत भ्रमंतीसाठी आला होता. अकीहिरो असे त्याचे नाव आहे. वाराणसीत आल्यावर त्याची ओळख टुरिस्ट गाईडशी झाली. बुधवारी संध्याकाळी टुरिस्ट गाईडने त्याला गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खायला देवून त्याच्याकडील सामान लुटले. त्यात कॅमेरा, मोबाईल, पासपोर्ट आणि सुमारे ५० हजारांची रक्कम लूटली. हे लक्षात आल्यानंतर अकीहिरो पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पोलीसांनी त्याला वकील बघून देण्यास मदत करत आहेत.
देशाची प्रतिमा दूषित
पर्यटकांना लूटण्याचा, मारहणीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र त्यामुळे आपल्याच देशाची प्रतिमा दूषित होते, हे लक्षात घ्यायला हवे.