नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
प्रताप नाईक, अनिल पाटील झी मीडिया गोवा : गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टीनेशन गोवा, पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय. देखण्या मंदिरांत भाविकांची वर्दळ वाढलीये. चर्च विद्युत रोषणाईन न्हाऊन निघालेत. देशभरातला तापमान खाली गेलं तरी गोव्यातला पारा मात्र २०-२२ अंशावरच असतो. त्यामुळे पर्यटक दिवसभर समुद्राचा मनमुराद आनंद घेताहेत.
हॉटेल्समध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. यात लाईव्ह बॅंड, डान्स,आतिषबाजी आदींचा समावेश आहे.
किनायावरचे हॉटेल सर्वच हाऊसफुल्ल आहेत. देशी विदेशी कलाकारही गोव्यात दाखल झालेयत. अन् सुरु झालंय न्यू इअरचं काऊंडडाऊन...
पार्टीमध्ये डान्स गाण्यांबरोबर खास मोठा मेनू तयार आहे. यात इंडियन, चायनीज कॉन्टिनेन्टल फूड आहे. पर्यटकांची संख्या पाच लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. दिवसभर किनार्यांचा आस्वाद आणि रात्री जल्लोषी पार्ट्या असा असतो थर्टीफर्स्टचा गोव्यातला बेत...
उत्तर गोव्यातल्या कलंगुट, बागा, मोरजी, सिक्केरी आणि कांदोळी किनाऱ्यांवर तर दक्षिण गोव्यात कोलवा, वार्का, बाणावली आणि मोबोर बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेतायत.
कॅसिनोही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी सज्ज आहेत आणि मनोरंजनासाठी देशी विदेशी कलाकारांचा ताफा इथं दाखल झालाय. मुख्य गाला पार्टीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
या सेलिब्रेशनला कुठलही गालबोट लागू नये म्हणून पोलीस, दहशतवाद विरोध विशेष दल, राखीव दलाच्या तुकड्या आणि अमली पदार्थ विरोधी पथकं तैनात आहेत.
गोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी