मुंबई : अनेकदा जादूगारांना हातचलाखी करताना तुम्ही पाहिलं असेल... यालाच नजरेचा धोकाही म्हटलं जातं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. हा नजरेचा धोका आहे की आणखी काही? हे तुम्हाला पाहूनच कळेल... यामध्ये काही जादू नाही मात्र लोकांच्या नजरेला धोका नक्कीच मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका पुलावर अनेक गाड्या आणि मोटारसायकल प्रवास प्रवास करताना दिसत आहेत. ही वाहनं जशी एक वळण घेतं तशी ती गायब होताना या व्हिडिओत दिसतात. 


ट्विटरवर ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ अपलोड केलाय त्याचं नाव डॅनियल आहे. डॅनियलनं (@DannyDutch) हा व्हिडिओ २९ जून रोजी ७ वाजता आपल्या ट्विटर अकाऊंट वर अपलोड केलाय. 


व्हिडिओ पोस्ट करताना डॅनियलनं म्हटलंय, 'होय, ट्रॅफिक गायब होतंय' या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेत. या व्हिडिओला अनेक जणांनी रिट्विटही केलंय. 


व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांनाही धक्का बसतोय. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून 'दुसऱ्या दुनियेत जाणारा रस्ता' म्हटलंय. तर अनेकांनी मजेमजेत या व्हिडिओला 'बरमूडा ट्रँगल' म्हटलंय. 


परंतु, ट्विटरवर एका युझरनं त्यावर स्पष्टीकरण देत ही वाहनं कुठे गायब होतात याचं उत्तर दिलंय. त्याच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओत जो पूल दिसतोय तो पूल नाही तर एक रस्ताच आहे. तसंच व्हिडिओत जी नदी दिसतेय ती नदी नाही तर एका पार्किंग लॉटची गच्ची आहे... त्यामध्येच कार आणि मोटारसायकल जाताना दिसत आहेत.