नवी दिल्ली : मदत आणि संरक्षण करण्यासाठी पोलीस नेहमीच मदत करतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलीस जीवाची बाजी लावून चिमुकल्या बाळाचे प्राण वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसाचं कौतुक होत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक पोलीस एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. त्याने बससमोर उडी मारून मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. सुंदर लाल नावाचा कॉन्स्टेबल ड्युटी करत आहे. तेवढ्यात एक मुलगा जवळून जाणाऱ्या रिक्षातून खाली पडतो. रस्त्यावर वाहतूक सुरू आहे. त्याचवेळी समोरून एक मोठी बस येत होती, मात्र त्याआधीच वाहतूक पोलिसाने उडी मारून मुलाला बसच्या समोरून वाचवले.


ट्रॅफिक पोलिसांनी वाचवले प्राण
ट्रॅफिक पोलिसाने तातडीनं पुढे धावत जाऊन या चिमुकल्या मुलाचे प्राण वाचवले आणि आईच्या ताब्यात दिलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्वीटरवर शेअर केला. 


वाहतूक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तर रिक्षा चालक आणि या चिमुकल्याच्या पालकांवर युजर्सनी टीका केली आहे. वेळीच बसचालकाने हजरजबाबीपणा दाखवून बस थांबवल्याने त्याचंही कौतुक होत आहे.