आग्रा : गुरुवारी, 'ट्रेन १८' या भारतातील सर्वात जलद रेल्वेची ट्रायल रन घेण्यात आली. दिल्ली ते आग्रा या मार्गावर या रेल्वेची चाचणी पार पडणार होती... परंतु, याची कुणकुण लागल्यानंतर धावत्या रेल्वेवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. २९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेचं लोकार्पण करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंट्रीग्रल कोच फॅक्ट्री'मध्ये या रेल्वेवर अजूनही काम सुरू आहे. महाव्यवस्थापक सुधांशु मनु यांनी या रेल्वेवर दगडफेक झाल्याची माहिती सोशल मीडियातून दिलीय. तसंच दगडफेक करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.


दिल्ली ते आग्रा या मार्गावरून 'ट्रेन १८' ही रेल्वे १८० किलोमीटर प्रती तास तेजीनं धावत होती. यावेळी आयसीएफचे मुख्य डिझाइन इंजिनिअर श्रीनिवास चालक डब्यात उपस्थित होते. परंतु, यावेळी काही समाजकंटकांकडून या रेल्वेवर अचानक दगडफेक करण्यात आली. त्यामुळे रेल्वेच्या काचा फुटल्या.... अशी माहिती मनु यांनी दिलीय.


तर, सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवणारं कोणतंही कृत्य निंदनीय असल्याची प्रतिक्रिया आयसीएफचे प्रवक्ते जी व्ही वेंकटेसन यांनी दिलीयच.


'ट्रेन १८'मध्ये वाय फाय, जीपीएस बेस्ड प्रवासी सूचना प्रणाली, टच-फ्री बायो-शौचालय, एलईडी लाईट, मोबाईल चार्जिंग पॉईंट तसंच प्रवाशांना तपमानाची माहिती देणारी अदययावत यंत्रणा उपलब्ध असेल.