Plane Crash in Pune : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune News) गोजुबावी गावाजवळ प्रशिक्षणादरम्यान एक विमान क्रॅश झालं आहे. या विमानात प्रशिक्षणार्थी पायलट आणि एक प्रशिक्षक होते. दोघंही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं विमान होतं. बारामतीमध्ये आज सकाळी सात वाजता घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत वातावरण असल्याचं समोर आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोजुबावी गावाजवळ आज सकाळी रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेचं विमान प्रशिक्षणासाठी गेलं असताना ही घटना घडली. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी पायलट या दोघांनीही जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.  रेड बर्ड अकादमी टेक्नमच्या विमानाला बारामती एअरफील्डच्या उत्तरेस 2 मैलांवर एका ठिकाणी आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघंही सुरक्षित आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीजीसीएने एका निवेदनात दिली आहे. 


गेल्या 4 दिवसात दुसरी घटना


बारामतीच्या औद्योगिक परिसरात रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी आहे. याठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. मात्र, काही दिवसांपूर्वी एका शिकाऊ वैमानिकाचा देखील अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. अशातच आता चार दिवसानंतरच आता दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.



दरम्यान, गेल्या चार दिवसात दोन घटना समोर आल्याने पोलिसांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? याचा छडा लावण्यासाठी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.