Pet Travel Tips : आपल्या सर्वांकडेच हल्ली पेट म्हणजेच पाळीव प्राणी असतातच. त्यांच्यासोबत आपण अनेकदा फिरायलाही जातो परंतु जर कुठल्या लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर काय करावं हे आपल्याला सुचत नाही. आपल्या पेटला घेऊन लॉन्ग टूरला कसे जायचे याची आपल्याला काहीच कल्पना येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीकधी लोक त्यांच्या पेट्समुळेच लांबच्या सहली रद्द करतात कारण प्राण्यांना सोबत घेऊन जाणं हे त्याच्यासाठी काळजीचे कारण ठरू शकते. आपल्या पेटला आपण सांभाळायचे कसे हेच त्यांना कळतं नाही. पण चिंता करू नका तुम्ही जर खाली दिलेल्या टीप्सना फोलो केले तर तुम्ही नक्कीच तुमच्या पेटसोबत आरामात फिरायला जाऊ शकता. 


1. जर तुम्हाला विमानाने प्रवास करणे शक्य असेल तर काही एअरलाइन्स आहेत ज्या पाळीव प्राण्यांना सोबत नेण्याची परवानगी देतात. यामध्ये 'स्पाइस जेट', 'एअर इंडिया'सारख्या विमान कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.


2. जर तुम्ही फ्लाईटमधून पेट्स ना घेऊ जात असाल तर त्यासाठी काही नियम आहेत. विमानप्रवासासाठी पाळीव प्राण्याचे वजन 5 किलोपेक्षा कमी असावे आणि त्यांचे वय 8 आठवड्यांपेक्षा जास्त नसावे.


3. जर तुम्हाला तुमच्या पेटसोबत कारने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारमध्ये पेटच्या बसण्याची व्यवस्था करा अशी करा की त्याला नीट प्रवास करता येईल आणि शक्य असल्यास नेहमी पुढच्या सीटवर त्याला ठेवा. 


4. सहलीला पेट्स सोबत जाण्यापूर्वी तुम्ही बुकिंग करत असलेले हॉटेल पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल आहे की नाही हे देखील तपासणे आवश्यक आहे. त्या जागेबद्दल संपुर्ण माहिती करू घ्या.