सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!
गाडी चोरून पळून जात असताना सेक्यूरिटी गार्डने डोकं लावलं!
CCTV Video: सीसीटीव्ही म्हणजे आपल्या सर्वांचा तिसरा डोळा. सीसीटीव्हीमुळे चोरीच्या घटना कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. त्यातील सीसीटीव्ही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असाच एक दिल्लीतील व्हिडीओ (Delhi CCTV Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे. (Thieves ran after stealing the bike the security guard quickly closed the gate CCTV Video viral)
मागील काही दिवसांपासून दिल्लीत गाडी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येतंय. अनेक टोळ्या दिल्लीत सक्रिय असल्याने पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. मात्र, अशीच एक घटना घडत असताना चोरट्यांचा डाव एका सेक्यूरिटी गार्डच्या तत्परतेने फसला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (CCTV Video viral) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
झालं असं की...
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन चोर दुचाकी चोरी करून पळून (stealing the bike) जाण्याच्या प्रयत्नात असतात. दुचाकी चालवणारा चोर फुल्ल स्पीडमध्ये गाडी चालवत असताना सेक्यूरिटी गार्डने पाहिले. त्यावेळी सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली. त्याने जराही वेळ न घालवता सोसायटीचं गेट बंद केलं.
मग काय, सेक्यूरिटी गार्डने गेट बंद (Security guard quickly closed the gate) केल्याने चोरट्यांचा डाव फसला. जोरात गाडी पळवत असल्याने ब्रेक देखील मारता येईना. गाडी थेट गेटवर धडकली आणि दोन्ही चोर दुचाकीवरून पडले. आजूबाजूला असलेले लोक तात्काळ गेटजवळ पोहोचले. गाडीवरून पडल्यानंतर देखील चोरट्यांची जिरली नाही. त्यानंतर देखील चोरट्यांनी गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आसपासच्या लोकांनी चोरांना पकडलं.
दरम्यान, ही संपुर्ण घटना दिल्लीतील (Delhi Crime) कालका जी एक्स्टेंशनमधील एव्हरेस्ट अपार्टमेंट सोसायटीमधील असल्याची माहिती समोर आली आहे. चोरांनी एमसीडी अधिकारी असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला होता. एका कुरीयर बॉयची गाडी चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता.
आणखी वाचा -
तुम्हाला वाटेल स्क्रीनला काय झालं? पण थांबा, Google ने कमाल केलीये..