Change Railway Platforms video : सोशल मीडिया आपल्या भयानक आणि धक्कादायक व्हिडीओ (Horrible and shocking video) मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. तुम्ही आम्ही प्रत्येक जण रेल्वेने कधी ना कधी प्रवास करतो. मुंबईमध्ये तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई लोकलचा वापर केला जातो. म्हणून मुंबई लोकला (Mumbai Local) मुंबईकरांची लाइफ लाइन (lifeline of Mumbaikars) म्हटलं जातं. रेल्वे स्टेशन आणि रेल्वे प्लॅटफॉर्म (Platform), धावती ट्रेन (Train) पकडतानाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ  (Shocking video) आपण पाहिले आहेत. रेल्वे अपघाताचे थरकाप उडवणार व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. पण रेल्वे अपघाताचा थरार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


प्लॅटफॉर्मवरील धक्कादायक व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे स्टेशनवर  (Indian Railway Station) धावती रेल्वे पकडू नका, एका प्लॅटफॉर्म दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळावरुन जाऊ नका, अशा अनेक प्रकारच्या सुचना वारंवार केल्या जातात. मात्र प्रवाशी (Passenger) त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक प्रवासी थेट रेल्वे रुळावर जाऊन झोपला. एवढंच नाही तर समोरून वेगान एक्स्प्रेस त्याच्या दिशेने आली. हा धक्कादायक व्हिडीओ आपण निशब्द होतो. एक्स्प्रेस त्या व्यक्तीच्या अंगावरुन जाते. ते भयानक दृश्यं पाहून लोकही हैराण झाले आहेत.असं काय झालं की तो व्यक्ती थेट रेल्वे रुळावर जाऊन झोपला...



प्लॅटफॉर्मवर जाण्याचा हा कुठला मार्ग? 


हा व्हिडीओमागील वास्तव जाणून तुम्हाला धक्का बसेल. हा व्यक्ती एका प्लॅटफॉर्म वरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा हा शॉर्टकटचा (Shortcut)वापर करतो. पण जीव धोक्यात घालून..या व्यक्तीने जे केलं ते पाहून अनेकांचा राग अनावर होतो.हृदय पिळवटून टाकरणार हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतो आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ बघावा आणि त्यातून बोध घ्यावे. आपलं घरी कोणी वाट पाहतं आहे कायम लक्षात ठेवा, थोडा उशिर झाला तरी चालेल पण विनाकारण जीव धोक्यात घालू नका.