Bengaluru Police Extorted Couple: रात्री उशीरा रस्त्यावरुन चालणाऱ्या एका दाम्पत्याकडून (Couple) पोलिसांनी (Police)  जबरदस्तीने दंड आकारल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या त्रासामुळे नाहक मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या या दाम्पत्याने सोशल मीडियावर हा वाईट अनुभव शेअर केला आहे. पती-पत्नी असल्याचं सांगितल्यानंतरही पोलिसांनी उलटसुलट प्रश्न विचारून त्रास दिल्याचं या दाम्पत्याने म्हटलं आहे. पेट्रोलिंगच्या नावाखाली दाम्पत्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. (bengaluru police allegdly extorted a couple)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाम्पत्याकडून जबरदस्तीने वसूली
बंगळुरुमधील ही घटना असून मिळालेल्य माहितीनुसार पती आणि पत्नी एका बर्थ पार्टीवरुन (Birth Day Party) रात्री उशीरा घरी परतत होते. पायी चालत असताना पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवलं. हे दाम्पत्य घरापासून काही अंतरावरच होते, पण रात्री अकरा वाजल्यानंतर रस्तावर फिरत असल्याचं कारण देत पोलिसांनी दाम्पत्यावर एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दाम्पत्याने Paytm च्या माध्यमातून दंड भरला.


सोशल मीडियावर शेअर केला अनुभव
कार्तिक पत्री असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आलेला वाईट अनुभव सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. कार्तिक पत्री याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, त्यात त्याने म्हटलंय. 'मला आमच्याबरोबर घडलेला एक वाईट अनुभव शेअर करायचा आहे, मी आणि माझ्या पत्नीबरोबर रात्री उशीरा ही घटना घडली आहे. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मी आणि माझी पत्नी एका मित्राच्या घरातून बर्थ डे पार्टीवरुन घरी परतत होतो, आम्ही मान्यता टेक पार्कच्या मागील सोसायटीत राहतो'. 



कार्तिकने सांगितला तो किस्सा
कार्तिकने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलंय, आम्ही आमच्या घरापासून काही मीटर अंतरावर असताना पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन आमच्या जवळ येऊन थांबली. पोलिसांनी आम्हाला आयकार्ड दाखवायला सांगितलं, त्यामुळे काही क्षण आम्ही आश्चर्यचकीत झालो. यानंतर आम्ही आमचं आयकार्ड पोलिसांना दाखवलं.  पण यानंतरही पोलिसांनी आमचे फोन जप्त केले. पोलिसांच्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली. पण यानंतरही पोलिसांनी आम्हाला रात्री अकरा नंतर रस्त्यावर फिरणं बेकायदेशीर अससल्याचं सांगत दंड भरण्यास सांगितला. आधी पोलिसांनी आमच्याकडे तीन हजार रुपये मागितलं, पण विनंती केल्यानंतर एक हजार रुपये घेण्यात तयार झाले. पेटीएमवर हे पैसे भरण्यास आम्हाला सांगण्यात आलं' असं कार्तिकने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 



दोन पोलीस कर्मचारी निलंबित
सोशल मीडियावर हे प्रकरण आल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लोकांनी टीका केली. याची दखल पोलीस विभागाला घ्यावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं.