Chakki Bridge Collapsed : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पंजाज सीमेवरील चक्की नदीवरील रेल्वे पूल कोसळला आहे. चक्की नदीला अचानक पूर आल्यामुळे पुलाचा कमकुवत खांब वाहून गेले. पूल कोसळण्याची धक्कादायक दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चक्की नदीवरील  800 मीटर लांबीचा हा रेल्वे पूल नदील्या आलेल्या पुरात खंबीरपणे उभा राहू शकला नाही. (trending news dhimachal 800 meter long railway bridge over chakki river washed away watch viral video in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पूल कोसळल्यामुळे  पठाणकोट ते जोगिंदरनगर दरम्यानची नॅरोगेज ट्रेन पूल दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे. या पुलावरून पठाणकोट ते जोगिंदरनगर दरम्यान दररोज सात गाड्या धावत होत्या.हा पूल ब्रिटीशांनी 1928 मध्ये बांधला होता. 


बेकायदा उत्खननामुळे या पुलाची यापूर्वीच दुरवस्था झाली होती, असं ग्रामस्थांचं म्हणं आहे. जिथे रस्ता किंवा बस सेवा पण जात नाही अशा पोंग डॅम वन्यजीव उभयारण्यात वसलेल्या ग्रामस्थांसाठी ही रेल्वे लाइन म्हणजे लाइफलाइन आहे. बेकायदा उत्खननामुळे पुलाचे नुकसान झाल्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्या होत्या.गेल्या महिन्यापूर्वी रेल्वे पुलाच्या एका खांबाला तडे गेल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती आणि आता रेल्वे पूलच कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.