मला लगीन कराव पायजे, पण... ? लग्नासाठी मुलीने दिलेली जाहीरात चर्चेत
मुलीने लग्नासाठी दिलेल्या जाहीरातीत ठेवलेल्या अटी पाहून लोकं म्हणतात, या जन्मात तरी शक्य नाही
Trending News : लग्नासाठी वधू पाहिजे, वर पाहिजे अशा अनेक जाहीराती पेपरमध्ये येत असतात. चांगली नोकरी, वर्ण गोरा, सरकारी नोकरी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा, 25 ते 30 वर्षे वयोगटातला, धर्म आमूक हवा, जात तमूक हवी…',अशा जाहिराती आपण अनेकदा वाचल्या असतील. लग्नासाठी मुला-मुली अनेक अटी ठेवतात. पण एक जाहीरात चांगलीच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या जाहीरातीत मुलीने ज्या अटी ठेवल्या आहेत. त्या वाचून कोणीही थक्क होईल.
असं म्हणतात लग्नाच्या गाठी वर देवाच्या दारी बांधल्या जातात. पण खाली पृथ्वीवर आपला जोडीदार शोधण्यात मोठे कष्ट घ्यावे लागतात. नातेवाईक ते मॅट्रिमोनियल साईटवर वधू - वराचा शोध घेतला जातो. यासाठी आपला प्रोफाईल आणि जोडीदाराकडूनच्या अपेक्षा दिल्या जातात. पण काही वेळा जाहीरात देताना अवास्तव अपेक्षा व्यक्त केल्या जातात ज्यामुळे चर्चेचा विषय बनतो.
मुलीच्या विचित्र अटी
सध्या सोशल मीडियावर लग्नासाठीची अशीच एक जाहीरात चर्चेचा विषय बनली आहे. एका मुलीने आपल्या जोडीदाराकडून इतक्या अपेक्षा ठेवल्यात की लोकं म्हणतायत हिला या जन्मात तर असा मुलगा मिळणं मुश्किलच. या जाहीराताची एक स्क्रिन शॉट व्हायरल होत आहे. त्यात तीने म्हटलंय. 'मुलाचा जन्म 1992 च्या आधीचा नसावा. मुलाचं घर दिल्ली एनसीआरमध्ये असावं, तसंच त्याची उंची 5.7 ते 6 फूटापर्यंत असावी. घरात दोन भावा-बहिणींशिवाय जास्त नसावेत. त्याचं कुटुंब शिकलेलं असावं. मुलाकडे MBA, MTech, MS, PGDM ची डिग्री आणि तीही IIT, NIT किंवा IIM सारख्या संस्थांमधून असावी. मुलगा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा असावा आणि त्याचा पगार वर्षाला किमान 30 लाख रुपये इतका असावा.
ही जाहीरात ट्विटरवर @RetardedHurt नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या ट्विटरला 250 अधिक जणांनी लाईक केलं असून अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
एका युझरने म्हटलं ही जाहीरत लग्नासाठी आहे की नोकरीसाठी. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, या मुलीला लग्नासाठी नवरा हवा आहे की ATM. त्या मुलीला तिच्या मनासारखा मुलगा मिळतो की नाही हे माहित नाही पण ही जाहीरात सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलीय हे नक्की.