लावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज
Viral News in Social Media: सोशल मीडियावर एका मुलीने शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मुलीने नेटकऱ्यांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
Viral Photo: सध्या इंटरनेटचं (Internet) युग आहे. बसल्या जागी आपल्याला सोशल मीडियावर (Social Media) जगातील सर्व माहिती मिळत असते. इतकंच नाही तर अनेक व्हिडिओही शेअर केले जात असतात. यातले काही व्हिडिओ माहिती देणारे असतात. तर काही व्हिडिओ निव्वळ मनोरंजन करणारे असतात. काही व्हिडिओ असे असतात ज्याची देशभरात चर्चा होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार (Social Media Star) झालेलेही अनेक जण आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही असे व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लोकं यावर केवळ प्रतिक्रियाच नाही तर तो फोटो शेअरही करतायत.
आपण सर्वांनी शालेय जीवनात ग्रॅव्हेटीची थिअरी, पायथागोरस आणि त्रिकोणमिती गणिताचा अभ्यास केला असेल. पुढील जीवनात कधी ना कधी या सर्व अभ्यासाचा उपयोग होईल असं वाटतं, पण खऱ्या आयुष्यात हा अभ्यास कुठे गायब झाला हे लक्षातच आलं नाही. पण एका ट्विटर युजरने या सर्व ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग केलाय, आणि तोही सोशल मीडियावर एका मुलीने दिलेल्या चॅलेंजला उत्तर देण्यासाठी.
फोटो होतोय व्हायरल
ट्विटर यूजर पल्लवी पांडे हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर (Twitter Account) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पल्लवी पांडे एका इमारतीच्या समोर उभी आहे. तीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिची सावली इमारतीच्या पायऱ्यांवर दिसत आहे. हा फोटो शेअर करत पल्लवीने नेटकऱ्यांना एक चॅलेंज दिलं आहे. या फोटोच्या माध्यमातून आपली अचूक उंची (Height) ओळखा असा प्रश्न तीने विचारला आहे. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत, एका युजरने तर हैराण करणारं उत्तर दिलं आहे.
पल्लवीने विचारलेला प्रश्न या युजरने खूपच गांभीर्याने घेतला आहे. फोटोतल्या मुलीची अचूक उंची ओळखण्यासाठी त्याने गणिताचे सर्व फॉर्म्युलांचा वापर केला आहे.
पल्लवीने या युजर्सने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. तसंच त्या युजर्सचं उत्तर तीने शेअर देखील केलं आहे. यासोबत तीने कॅप्शन लिहिलं असून तुम्ही केलेल्या प्रयत्नांना सलाम मी त्याही पेक्षा उंच असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अनेक युजर्सने प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजरने तिची उंची 5.5 सांगितली आहे. तर एका युजरने 6 फूट उंची असल्याचं म्हटलं आहे.