Kashmiri Boy Imtiyaz Sheikh : प्रेम आंधळं असतं, प्रेमात जात-पात, गरीब-श्रीमंत काही पाहिलं जात नाही. इतकंच काय देशही पाहिला जात नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पाकिस्तानी प्रेयसीच्या (Pakistani Girl) प्रेमात वेडा झालेला एक प्रियकर काश्मिरहून थेट कच्छमध्ये (Kashmir to Kutch) पोहोचला. यासाठी त्याने गुगल मॅपची मदत घेतली. कच्छ बॉर्डरमार्गे या तरुणाला पाकिस्तानात प्रवेश करायचा होता. काश्मिरमध्ये राहाणाऱ्या या तरुणाचं नाव इम्तियाज शेख असं आहे. कच्छमधल्या खावडा बस स्थानकावर उतरल्यानंतर इम्तियाजने आपल्याला पाकिस्तानात जायचं आहे, वीजा कसा मिळेल अशी विनंती केली. पोलिसांनी त्याला ताब्यात चौकशी केली त्यावेळी त्याीच कहाणी ऐकून पोलीसही हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतर्फी प्रेमात वेडा


एमएडचं शिक्षण घेतलेला 44 वर्षांचा इम्तियाज शेखला इन्स्टाग्रामवर पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील आलिया नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. तिला भेटण्यासाठी त्याने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो काश्मिरहून कच्छ बॉर्डरवर पोहोचला. झी समुहाच्या Zee 24 Kalak या चॅनेलने आपल्या रिपोर्टमध्ये इम्तियाजने त्या पाकिस्तानी मुलीला भेटण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतल्याचं सांगितलंय. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाप्रमाणे इम्तियाज काश्मिरहून कच्छ बॉर्डरपर्यंत पोहोचला.


कच्छ बॉर्डरवर पोहोचल्यानंतर इम्तियाजने बॉर्डरवरच्या पोलिसांकडे पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी वीजा देण्याची विनंती केली. तरुणाच्या या मागणीने पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तात्काळ इम्तियाजला ताब्यात घेतलं. पाकिस्तान का जायचं आहे याचं कारण विचारल्यावर इम्तियाजने पाकिस्तानी मुलीच्या प्रेमासाठी तिला भेटायचं असल्याचं सांगितलं. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात राहाणाऱ्या डॉ आलिया सोहेब या नावाच्या मुलीचा फोटो त्याने इन्स्टाग्राम आयडीवर पाहिला. तेव्हापासून इम्तियाजवर एकतर्फी प्रेम करत होता.


तरुणाच्या कुटुंबियांनी दिली माहिती


इम्तियाजला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरच्यांना याबाबतची माहिती दिली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार इम्तियाज हा पाकिस्तानी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता, तिच्या प्रेमात तो मानसिक तणावाखाली आला आणि कोणालाही न सांगता त्याने घर सोडलं. तरुणाकडे कोणतंही आपत्तीजनक सामान मिळालं नाही. त्यामुळे पोलिसांनी इम्तियाजला चेतावणी देऊन सोडून दिलं.


पोलिसांनी तरुणाकडे आधारकार्ड सापडलं असून यात काश्मिरमधल्या बादीपुवा जिल्ह्याचा पत्ता होता. यावरुन पोलिसांनी तिथल्या हाजीन पोलिसांची संपर्क साधत तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. इम्तियाजचा लहान बाऊ मुश्ताकने दिलेल्या माहितीनुसार इम्तियाज मानसिकदृष्ट्या त्रासलेला आहे, त्यामुळे त्याने घर सोडल्याचं सांगितलं. इम्तियाज काश्मिरमधल्या एका दुकानात मजुराचं काम करतो.