कोर्ट की कुस्तीचा आखाडा, दुसऱ्यांसाठी लढणाऱ्या महिला वकिल एकमेकिंनाच भिडल्या... Video व्हायरल
एकमेकिंचे केस ओढले, लाथा-बुक्क्यांनी मारलं... कोर्ट परिसरातच महिला वकिलांमध्ये `दे दणादण`
Trending Video : छोट्या-छोट्या गोष्टींवरुन पती-पत्नी, मित्रांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात. काही वेळा हे प्रकरण तिथेच मिटतं. तर काही वेळा हे प्रकरण अगदी कोर्टापर्यंत (Court) जातं. कोर्टात वकिल कायद्यानुसार न्याय मिळवून देण्यासाठी लढतात. पण हेच वकील जर आपापासत भिडले तर. आणि त्यातच ही महिला वकिल असतील तर चर्चा होणारच. सध्या सोशल मीडियावर (Social Media) कोर्टाच्या परिसरातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कोर्टातील दोन महिला वकील जोरदार हाणामारी करताना दिसत आहेत. (Two Ladies lawyer Fight in Court Aria)
महिला वकिलांमध्ये 'दे दणादण'
कोर्टात दोन महिला वकिलांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कोर्ट परिसरातच या दोघींमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी सुरु झाली. हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्हा न्यायालयामध्ये घडला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाबाहेर हि हाणामारी झाली.
व्हिडिओत एक महिला वकिल खाली पडलेली दिसत आहे. त्यानंतर उठून ती दुसऱ्या महिला वकिलाला मारायला जाताना दिसतेय. पुन्हा दोघींमध्ये हाणामारी होते. एकमेकांचे केस ओढत, थप्पडबाजी करताना या महिला वकिल व्हिडिओत दिसतायत. शेवटी एक महिला पोलीस मध्यस्थीकरत दोघांचं भांडण सोडवते. हाणामारी पाहण्यासाठी कोर्टात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पण गर्दीतल्या एकानेही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये हाणामारी कैद करण्यात व्यस्त होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर
महिला वकिलांमध्ये रंगलेल्या या भांडणाचा व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अवघ्या 45 सेकंदात तब्बल 68 हजारहून जास्त वेळा व्हिडिओ बघितला गेला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. एका युजरने लिहिलंय 'या मारामारीत जी महिला वकिल जिंकेल, तिचा क्लायंट केस जिंकेल' तर एकाने लिहिलंय भांडणं सोडवणारेच भांडणं करायला लागले तर आम्ही कोणाकडे दाद मागायची.