महिला कॉन्स्टेबल एका दिवसात बदलली; म्हणाली प्रियकर नाही, तो तर पिता समान
तक्रार नोंदवल्यानंतर देखील महिला कॉन्स्टेबल सतत आपले वक्तव्य बदलत होती.
मुंबई : मध्यप्रदेशातील बार्ही येथे तैनात असलेले टीआय संदीप अयाची आणि महिला कॉन्स्टेबल यांच्या प्रेमकथेत एक नवा ट्विस्ट आला आहे. महिला कॉन्स्टेबलने केलेल्या गोंधळानंतर, स्वत: आरोप केलेली महिला कॉन्स्टेबलने त्याच्या बचावासाठी पुढे आली. लेडी कॉन्स्टेबलने सोमवारी कटनी येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात लाइन स्पॉट संदीप अयाचीच्या बाजूने स्टेटमेंट देण्यासाठी पोहोचली. तेथे तिने नंतर संदीप अयाची माझ्या वडिलांप्रमाणे असल्याचे पोलिसांसमोर सांगितले. तिच्या या वक्तव्यानंतर सगळेच लोकं चक्रावले.
काही दिवसांपूर्वी जबलपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलने संदीप अयाचीसोबतच्या अफेअरवरून गोंधळ घातला होता. त्या दिवशी महिला कॉन्स्टेबलने टीआय संदीप अयाची यांच्या विरोधात अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज केडिया यांच्याकडे तक्रार केली आणि या सगळ्याची चौकशी करण्यासाठी सांगितले. ज्यामुळे संदीप यांना तपास होईपर्यंत नोकरीवरुन काढून टाकण्यात आले.
परंतु तक्रार नोंदवल्यानंतर देखील महिला कॉन्स्टेबल सतत आपले वक्तव्य बदलत होती. त्यानंतर एक दिवशी ही लेडी कॉन्स्टेबलने प्रतिज्ञापत्र देऊन टीआय संदीप अयाची यांच्या अडचणी कमी करण्याचे ठरवले आणि संदीप अयाची यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी ती पोलिसांना सांगू लागली.
त्यानंतर सोमवारी कटनी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर लेडी कॉन्स्टेबलने सांगितले की, 'मी कोणतीही तक्रार केलेली नाही, मग त्यांना कामावरुन का काढले गेले?'
संदीप अयाची हे माझ्या गार्डियन सारखे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे. माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती, भावनिक झाल्यामुळे मी असे बोलली, परंतु ते माझ्या वडिलांसारखे आहेत, असे ती म्हणाली.
या घटनेबद्दल सांगताना या महिलेनं सांगितले की, कुटुंबातील भांडणामुळे ती नाराज असल्याचे तिने असा निर्णय घेतला. 19 जानेवारी रोजी टीआय सरांना मायनर अटॅक आल्याची बातमी तिला कळली, ज्यामुळे ती त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेली. परंतु त्यांच्या घरच्यांनी तिला त्यांना भेटू दिले नाही. ज्यामुळे रागाच्या भरात तिने जबलपूर एसपीला फोन करुन त्याच्या विरोधात तक्रार केली असे सांगितले.
परंतु मायनर अटॅक येऊन देखील टीआय एवढ्या लवकर बरे होऊन पोलिस ठाण्यात कसे पोहोचले, याचे गुढ अद्याप अघडलेले नाही.