राकेश झुनझुनवाला यांची वॉरन बफेटसोबत तुलना, कोण आहे वॉरन बफेट?
भारतातील बिग बुलची तुलना कायम वॉरन बफेट (Warren Buffet ) यांच्याशी केली जात होती.
Rakesh Jhunjhunwala Death : शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं रविवारी सकाळी मुंबईत निधन झालं. त्यांना शेअर बाजाराचे सिकंदर (Stock Market King) असंही म्हटलं जातं होतं. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतही त्यांचं नाव होतं. भारतातील बिग बुलची तुलना कायम वॉरन बफेट (Warren Buffet ) यांच्याशी केली जात होती.
राकेश झुनझुनवाला व्यवसाय जगतात आपली वेगळीच छाप पाडली होती. झुनझुनवाला आयुष्यात कधीही कुठलाही जोखीम पत्करायला मागेपुढे पाहत नव्हते. त्यामुळे त्यांची तुलना वॉरन बफेटसोबत केली जात होती. आता तुम्ही म्हणाल की वॉरन बफेट कोण आहेत. तर चला जाणून घेऊयात बफेट यांच्याबद्दल (trending news rakesh jhunjhunwala stock market king also called indias warren buffet in marathi)
वॉरन बफेट कोण आहेत?
जगातील प्रसिद्ध अब्जाधीश गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे 92 वर्षांचे झाले आहेत. अमेरिकन कंपनी बार्कशायर हॅथवेचे वॉरन बफेट सीईओ आहेत. शेअर मार्केटमधील अनुभवी गुंतवणूकदार म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 7 व्या क्रमांकावर आहे. सध्या वॉरन बफेट यांच्याकडे $99.8 इतकी संपत्ती आहे. Occidental Petroleum Corp चे अतिरिक्त शेअर्स खरेदी केल्यानंतर Hathway Inc या तेल कंपनीत त्यांची 0 टक्क्यांहून अधिक शेअर आहेत. बर्कशायर या कपंनीने $16 बिलियन पेक्षा जास्त ऑपरेटिंग नफा मिळवला आहे.
वॉरन बफेट मालमत्ता करणार दान
वॉरेन बफेट यांनी संपत्तीपैकी 99 टक्के संपत्ती चॅरिटीला दान करण्याचे वचन दिले होते. यामुळे बर्कशायरमधील $ 90 स्टेकपैकी सुमारे $ 56 अब्ज गेट्स फाऊंडेशनला दिले जाणार आहेत. बफेट यांच्या मते त्यांचा संपत्तीमुळे दुर्बल घटकातील मुलांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचा या निर्णयामुळे जगातील आर्थिक आणि सामाजिक समतोल राखण्यास नक्की मदत होईल, असं अर्थ तज्ज्ञांचं म्हणं आहे.