मुंबई : RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  (Reserve Bank of India) UPI आधारित निधी हस्तांतरणावर शुल्क (Charge for Transferring Payment) आकारु शकते. यामुळे भविष्यात UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते. आरबीआयकडून पेमेंट ट्रान्सफरचा खर्च काढून टाकण्याचा विचार केला जात आहे.


शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला घेण्यात येत आहे. यासाठी RBI कडून 'डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम' जारी करण्यात आला आहे. आरबीआयने शुल्क (Charge) आकारण्याबाबत लोकांकडून सल्लाही मागितला आहे. मध्यवर्ती बँकेच्यावतीने, या पेपरमध्ये असे म्हटले आहे की, ऑपरेटर म्हणून, रिझर्व्ह बँकेला (RBI) RTGS मध्ये मोठ्या गुंतवणुकीची आणि ऑपरेटिंग खर्चाची भरपाई करावी लागेल.


UPI वर होणारा खर्च घेणार


रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार त्यात जनतेचा पैसा गुंतवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, त्याची किंमत काढून टाकणे आवश्यक आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमध्ये आकारले जाणारे शुल्क म्हणजे आरटीजीएस हे कमाईचे साधन नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले. परंतु भविष्यात ही सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहावी यासाठी UPI वर खर्च केला जाईल.


रिअल टाइम फंड ट्रान्सफरची सुविधा 


 UPI पेमेंट ट्रान्सफरसाठी रिअल टाइम ट्रान्सफरची सुविधा देते. त्याचप्रमाणे, ते रिअल टाइम सेटलमेंट देखील निश्चित करते. ही संपूर्ण यंत्रणा तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्याची आणि निधी हस्तांतरण कोणत्याही जोखमीशिवाय चालवण्याची गरज आहे. त्यासाठी खर्चही खूप होतो.


मोफत सेवेच्या स्थितीत महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आणि बनवण्याचा मोठा खर्च कोण उचलणार, असा सवालही आरबीआयने (RBI) केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या प्रश्‍नांवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात UPIमधून निधी हस्तांतरित करणे (Charges on UPI Transfer) महागडे ठरु शकते.