India-Pak Border : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या असाच एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या (Rajashtan) एका सरकारी शाळेतील 12 इयत्तेच्या परीक्षेचा आहे. राजनिती शास्त्रच्या या पेपरमध्ये प्रत्येकी दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तर लिहिली आहेत. यातला पहिला प्रश्न आहे. कारगिल युद्ध कधी आणि कोणत्या देशांमध्ये झालं होतं. तर दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमा आहे? (India-Pakistan Border) आणि त्याची लांबी किती आहे? या प्रश्नावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षकही कोमात गेले. या उत्तराचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्याचं उत्तर
कारगिल युद्ध कधी कोणत्या देशांदरम्यान झालं होतं, या प्रश्नावर विद्यार्थ्याने कारगिल युद्ध 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झाल्याचं लिहिलं. इथपर्यंत सर्व ठिक होतं. सर्वांनाच माहित आहे भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1999 कारगिल वॉर झालं होतं. पण दुसऱ्या प्रश्नावर विद्यार्थ्याने अकलेचे तारे तोडले आहेत. 


दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमा आहे? वास्तविक भारत-पाक दरम्यानच्या सीमेला LOC म्हणेज लाईन ऑफ कंट्रोल म्हणतात. यावर LOC Kargil हा चितपटही प्रदर्शित झाला होता. पण या विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर हैराण करणारं आहे. विद्यार्थ्याचं उत्तर होतं, भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमा हैदर (Seema Hider) आहे. तिची उंची 5 फूट 6 इंच आहे. दोन्ही देशांमधअये तिच्यावरुन लढाई सुरु आहे. असं या विद्यार्थ्याने उत्तर लिहिलंय. 


कोण आहे सीमा हैदर?
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीजवळच्या नोएडापासून 50 किलोमीटर दूर यमुना-एक्स्प्रेस इथला रबूपुरा हा परिसरात या वर्षाच्या जुलै महिन्यात अचानक चर्चेत आला. इथं राहाणाऱ्या सचिन मीणा नावाच्या तरुणासाठी पाकिस्तानातली सीमा हैदर नावाची तरुणी बॉर्डर पार करुन भारतात आली. आठवी पास असलेल्या सचिन कोरोना काळात एका दुकानात नोकरी करत होता. दुकानात रिकाम्या वेळेत तो मोबाईलवर पबजी गेम खेळायचा. सप्टेंबर 2020 मध्ये पबजी खेळताना कराचीतल्या सीमा हैदरशी त्याची ओळख झाली. दोघंही पबजी खेळता-खेळता चॅटवर एकमेकांशी गप्पा मारु लागले. 



गप्पांच्या नादात दोघांची चांगली मैत्री झाली. दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला आणि सीमा हैदरने आपला पासपोर्टही तयार केला. फेब्रुवारी 2023 मध्ये सीमाने विजासाठी परवानगी मागितली, पण तिला विजा देण्यात आला नाही. त्यामुळे दोघांनी नेपाळमध्ये भेटण्याचा प्लान आखला. 8 मार्चला काश्मिर गेटमधून बस पकडून सचिन तर पाकिस्तानातून दुबई आणि तिथून काठमांडू असा प्रवास करत सीमा हैदर नेपाळला पोहोचली.


नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात दोघांनी लग्न केलं. त्यानंतर सीमा हैदर आपल्या चार मुलांना घेऊन सचिनबरोबर भारतात आली. सीमा हैदरवर पाकिस्तानी जासूस असल्याचा आरोपही करण्यात आला होता.