IAS Tina Dabi:स्वत:पेक्षा 13 वर्षांनी मोठ्या व्यक्तीबरोबर टीना डाबी हिने का केलं लग्न? जाणून घ्या खरं कारण
Tina Dabi Marriage: टीना डाबी हिचे पहिले लग्न झाले होते. ती टॉपर असताना दुसऱ्या आलेल्या अतहर आमिरसोबत 2018 लग्न केले होते. मात्र, त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही.
मुंबई : IAS Tina Dabi and Pradeep Gawande:टीना डाबी यांची गणना देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयएएसमध्ये केली जाते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला टीना डाबीच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक माहिती देणार आहोत. हे जाणून तुम्हीही म्हणाल व्वा! टीना डाबीने दुसरे लग्न केले आहे. तिने आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्नही केले आहे. प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस आहेत. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली होती. त्यांनी औरंगाबाद येथून एमबीबीएस केले. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला.
टीना डाबीबद्दल सांगायचे तर, ती 2016च्या बॅचची टॉपर आहे आणि तिने पहिल्यांडाच परीक्षा उत्तीर्ण केली. टीना डाबीचे पहिले लग्न 2018 मध्ये तिच्याच बॅचचा दुसरा टॉपर अतहर आमिरसोबत झाला होता. मात्र, काही कारणांमुळे हे नाते फार काळ टिकले नाही. दोघांचा घटस्फोट झाला. टीना आणि अतहर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जयपूरमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज डाखल करुन एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या नव्या नात्याबद्दल सांगितले...
प्रदीप आणि टीना डाबी यांची जयपूरमध्ये भेट झाली. दोघांनी 4 महिने डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. टीना डाबी या 28 वर्षांच्या तर प्रदीप गावंडे 42 वर्षांचे आहेत. टीना डाबी सांगतात की, नात्याला आयुष्यभर ओझे मानण्यापेक्षा ते सोडून द्या आणि पुढे जा.
टीना डाबी सांगतात की, प्रदीप खूप चांगला माणूस आहे आणि तो आपली जबाबडारी चोखपणे पार पाडतो. टीनाच्या मते, आयुष्यात वयापेक्षा परस्पर समंजसपणा आणि सुसंगतता महत्त्वाची असते आणि त्या आधारेच नातेसंबंध ठरवले जातात. टीना डाबी हिच्या दुसर्या लग्नाबद्दल बोलायचे तर ते 22 एप्रिल 2022 रोजी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये झाले होते.