Trending News : सोशल मीडियावर सध्या भाषेवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. वास्तविक एका उत्तर भारतीय (North Indian) महिलेने बंगळुरुमध्ये भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडिया शेअर केला आहे.  सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर @shaaninani या नावाने महिलेने पोस्ट शेअर केली आहे. नोकरीनिमित्ताने ही महिला गेल्या दीड वर्षांपासून बंगळुरुमध्ये (Bangaluru) राहात होती. तीने पोस्टमध्ये लिहिलंय, मी गेल्या दीड वर्षांपासून  बंगळुरुमध्ये राहाते. माझं लग्न पंजाबमध्ये झालं. तिथल्या परंपरेनुसार एक वर्ष हातात चुडा घातला. पण यावरुन बंगळुरुमधल्या लोकांनी यावरुन मला उत्तर भारतीय असल्याचं मानलं'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाने प्रवास करण्याचा मनस्ताप
बंगळुरुमधल्या स्थानिक लोकांबरोबर व्यवहार करणं मनस्ताप असल्याचं या महिलेने म्हटलं आहे. महिलेने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय 'घरापासून ऑफिस आणि ऑफिसपासून घरापर्यंत रिक्षाने प्रवास करणं हा सर्वात मोठा छळ आहे. तुम्ही उत्तर भारतीय आहात का? इथे काय करताय? असे प्रश्न विचारण्याची हिम्मत इथले रिक्षावाले करतात. इतकंच नाही तर तुम्ही कन्नड शिकताय की नाही असा प्रश्नही विचारतात. जेव्हा रिक्षावाल्यांशी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून संवाद साधला जातो, तेव्हा या भाषणा कळत नसल्याचं ते नाटक करतात, असंही या महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.


केळव ऑटो रिक्षावालेच नाही तर इथले  BESCOM म्हणजे बंगळुरु इलेक्ट्रिसिटी सप्लाई कंपनी लिमिटेडचे कर्मचारीही परप्रांतिय लोकांनी अशाच प्रकारे वागतात. कस्टमर केअरला फोन केवळ कन्नड भाषेतून संवाद साधला जातो. या महिलेने एक उदाहरण सांगिलं. एकदा वीज गेल्यानंतर   BESCOM च्या हेल्फ लाईन नंबर फोन केला. तर समोरच्या व्यक्तीने 'No Hindi, no English, only Kannada' सांगत फोन कट केला. तिथेल लोकं केवळ कन्नड भाषेतून बोलल्यावरच समस्या ऐकून घेतात असंही या महिलेने सांगितलं.


महिलेने सोडली नोकरी
रिक्षापासून कार्यालयापर्यंत येणाऱ्या भाषावादाला कंटाळुन महिलेने तिथली नोकरी सोडली आणि ती पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. गुरुग्राममध्ये आपल्यावर आता आपल्या लोकांमध्ये आल्याचा आनंद वाटतोय. आता आपण दररोज वॉक करतो, चांगलं जेवण खातो, पाहिजे तीथे जाऊ शकते. इथे भाषेवरुन विचित्र प्रश्न विचारणारे रिक्षाचालक नसल्याचं या महिलेने म्हटलंय.


सोशल मीडियावर वाद
महिलेची पोस्ट सोशल मीडियावर 14 लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. यावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. काही युजर्सने या महिलेला पाठिंबा दिला आहे. तर काही युजर्सने असभ्य कमेंट केल्या आहेत. एका एका युजरने म्हटलंय 'हा प्रादेशिक/भाषिक द्वेष भारताच्या विचारांना मारणारा आहे. काही लोकं प्रोत्साहन देणे आणि भाषा लादणं यातील फरक समजत नाही. तर एका युजरने म्हटलंय, बंगळुरुमध्ये मलाही वाईट अनुभव आला. माझ्या अधिकाऱ्यांनी कन्नड शिकण्याचा आग्रह धरला होता.


पण काही लोकांनी या महिलेचा मुद्दा खोडून काढला आहे. दीड वर्ष कर्नाटकमध्ये राहून कन्नड शिकता आलं नाही का? असा प्रश्न काही युजर्सने विचारला आहे. स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करणं यात चूक नसल्याचंही काही जणांनी म्हटलं आहे. 


खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण
कर्नाटक विधानसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं. या नुसार खासगी नोकरीत कन्नड भाषिकांना आरक्षण देण्यात आलंय. हे विधेयक पारित झाल्यास कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये कन्नड भाषिकांना 50 ते 100 टक्के आरक्षण लागू केलं जाईल.