Trending News : उच्च शिक्षण घेतल्यानंतरही मनासारखी नोकरी मिळेलच असं नाही. काहींना नोकरी मिळते तर काही जण बेरोजगारच रहातात. पण रचित अग्रवाल या तरुणाची काहणी या सर्वांमध्ये वेगळी आणि युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रचित अग्रवाल या तरुणाल महिना 6 कोटी वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे शिक्षण संपताच त्याला नोकरीची ऑफर देण्यात आली. रचित अग्रवाल हा राजस्थानचा पहिला तरुण ठरला आहे ज्याला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे.


रचि अग्रवाल हा तरुण राजस्थानमधल्या कोटा शहरातल्या शक्तिनगर भागात रहातो. व्यवायिक राजेश अग्रवाल आणि संगीता अग्रवाल यांचा रचित मुलगा. रचितच्या वडिलांचा फूड पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. मुलाला दरमहा 50 लाख रुपये म्हणजे एक दिवसाचे 1 लाख 66 हजार रुपयांची नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. 


कोटात प्राथमिक अमेरिकेत उच्च शिक्षण
कोट्यवधी रुपयांची नोकरी मिळालेल्या रचितचं सुरुवातीचं शिक्षण कोटातल्या एका खासगी शाळेत झालं. त्यानंतर अभियांत्रिकी परीक्षेची तयारी करत असताना, रचितने अमेरिकेतल्या विद्यापीठातून शिक्षण घेण्याचं ठरवले आणि शैक्षणिक योग्यता चाचणी दिली, जी एक मानक परीक्षा आहे. याद्वारे अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.


दोन कोटीची स्कॉलरशिप
शैक्षणिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर रचितला दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. यातून त्याने टेक्सास विद्यापीठात कॉम्प्यूटर सायन्स या विषयासाठी प्रवेश घेतला. अभ्यासादरम्यान रचितने अनेक कोडिंग स्पर्धाही जिंकल्या. 


तीन स्टार्टअप सुरु केले
अमेरिकेत अभ्यासादरम्यान रचितने तीन स्टार्टअप सुरु केले. याच वर्षी रचितचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण होताच अनेक कंपन्यांनी रचीतला नोकरी ऑफर केली. यातून रचितने एका कंपनीची ऑफर स्विकारली. रचितला वार्षिक 8 लाख यूएस डॉलर म्हणजे भारतीय रुपयात वार्षिक 6 कोटी रुपयांचं वेतन मिळणार आहे.


सॉफ्टवेअर कोडिंग टीमचा भाग
अमेरिकेतल्या एसा मल्टिनॅशनल कंपनीत रचित एका सॉफ्टवेअर कोडिंग टीमचा भाग असणार आहे. रचितला ऑफर लेटरही मिळालं आहे. कंपनी पॉलिसीनुसार कंपनीचं नाव सार्वजनिक करण्यास मनाई करण्यात आली आहे.