नवी दिल्ली : जर आयुष्यात काही करुण दाखवण्याची ईच्छा तुम्ही मनात ठेवली तर, काहीच अशक्य नसतं. आपले आयुष्यात नेहमीच वेगवेगळी वळण येत असतात आणि आपल्याला आयुष्याचा खडतर प्रवास करत अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींपासून पळून जाणे सोपे आहे, परंतु त्यांना तोंड देणारे लोक फार कमी आहेत.  अशाच एक खडतर कहाणी आहे हरप्रीत सिंगची. त्याची कहाणी सांगते की सतत प्रयत्न, चिकाटी व परिश्रम केले तर काहीही अशक्य नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरप्रीत सिंग हा भारत बांग्लादेश सीमेवर BSF officer म्हणून काम करायचा, परंतू ड्यूटी नंतर जो वेळ मिळायचा त्या वेळेत त्याने अभ्यास करुन UPSCची परीक्षा देऊन IAS मध्ये 19वी रॅन्क मिळवली.


हरप्रीत सिंगच्या या यशामागचं कारण त्याचा बराच काळ सुरु असलेला संघर्ष आहे. जे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा देतात. यूपीएससीच्या तयारीचा त्याचा प्रवास 2013 मध्ये सुरू झाला. हरप्रीतने काही दिवस आयबीएममध्येही काम केले होते, पण IAS होण्याचे त्याचे लक्ष्य होते. पंजाबमधील लुधियानाचा रहिवासी असलेला हरप्रीत सिंह 2016 मध्ये बीएसएफमध्ये सहायक कमांडर म्हणून रुजू झाला.


सामील झाल्यानंतर काही दिवसांनंतर तो भारत-बांगलादेश सीमेवर तैनात झाला. कर्तव्यावर असताना त्याला जो काही थोडा-थोडका वेळ मिळायचा, त्यामध्ये तो यूपीएससीची तयारी करत असत. परिणामी  5 व्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले.


हरप्रीत म्हणाला की IAS होण्याचे लक्ष्य त्यांच्या मनात अगदी स्पष्ट होते. कोणतीही गोष्ट त्यांचे लक्ष विचलित करू शकत नाही. त्यांने आपल्या यशाचा मूळ मंत्र दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम आहे असे सांगितले.


हरप्रीत सिंह सांगतो की, आपण कधीही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे सोडून देऊ नये. पुढे तो म्हणाला की, 2017 मध्ये जेव्हा त्याने यूपीएससी परीक्षा दिली त्यावेळी तो 454 व्या क्रमांकावर होता. ज्यामुळे त्यांची निवड ट्रेड सर्विससाठी झाली. त्यानंतर त्याने बीएसएफची नोकरी सोडून ट्रेड सर्विसमध्ये रुजू झाला. पण 2019 मध्ये त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि 19 वा क्रमांक मिळवला.