सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाही तर? पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी गाजतेय. पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह पळून आलेली सीमा हैदर प्रियकरासह भारतातच राहण्यावर ठाम आहे. तर तिकडे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता यात पाकिस्तानमधले दरोडेखोरही उतरलेत.
Seema Haider Love Story : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सामी हैदरची (Seema Haider) लव्ह स्टोरी देशात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या प्रियकरला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरवरुन पाकिस्तानात (Pakistan) खळबळ उडाली आहे. तिथल्या लोकांनी तिला गद्दार ठरवलंय. इतकंच काय आता धमक्याही दिल्या जात आहेत. आता तर पाकिस्तानमधला दरोडेखोरही यातही उतरले आहेत. पाकिस्तानी डाकू रानो शार यांनी सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा असं म्हटलं आहे. सीमाला पाकिस्तानात पाठवलं नाही तर मंदिरांवर हल्ले केले जातील अशी थेट धमकीच रानो शार याने दिली आहे. इतकंच नाही तर सिंधमधल्या रेहरकी दरबारावही हल्ल्याची धमकी दिली आहे. हिंदु धर्मीयांवर हल्ला केला जाईल असंही त्याने म्हटलंय.
पाकिस्तानी दरोडेखोर (Robber) रानो शार धमकीची एक व्हिडिओ (Video) जारी केला आहे. यात तो म्हणतोय, आम्ही कबीलेवाले आहोत, आमची मुलगी पाकिस्तानातून भारतात गेली आहे. पण आमची मुलगी आम्हाला परत केली नाही तर हिंदू मंदिरांवर हल्ले केले जातील. इज्जत प्रिय असेल तर तिला परत पाठवा अशी धमकी रानो शारने या व्हिडिओत दिली आहे. रानो शारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्याने काही अपशब्दांचाही वापर केला आहे.
कोण आहे सीमा हैदर
ऑनलाईन पबजी खेळताना पाकिस्तानची सीमा हैदर आणि दिल्लीतल्या सचिनमध्ये (Sachin) मैत्री झाली. त्यांच्यात चॅटिंग सुरु झालं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आपल्या प्रियकरासाठी सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात पळूव आली. आता ती पुन्हा पाकिस्तानला जाऊ इच्छित नाही. सीमा हैदर आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे. PUBG खेळताना सचिनबरोबर प्रेम झाल्याचं तिने सांगितलं. सचिन ग्रेटर नोए़डातल्या एका गावात राहातो. सीमाला पाहाण्यासाठी सध्या मीडिया आणि लोकांची गर्दी होऊ लागली आहे. दूर दूर वरुन लोकं सचिन आणि सीमाला भेटायला येतायत.
दुसरीकडे पाकिस्तानमधल्या तिच्या गावातील लोकं तिच्यावर संतापली आहे. गंगा नदीत स्नान करुन हिंदू धर्म स्विकारणार असल्याचं सीमाने म्हटलंय यावर पाकिस्तानमधल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी पाकिस्तानची झाली नाही ती भारताची काय होणार? असा सवाल पाकिस्तानमधील लोकं व्यक्त करतायत.
'आमची मुलं पाठवून दे'
सीमा हैदरंच सासर पाकिस्तानमधल्या सुदूर बलूचिस्तानमध्ये आहे. तिच्या पहिल्या पतीचं नाव गुलाम हैदर असं असून या दोघांना चार मुलं आहेत. सीमा हैदरच्या पळून जाण्याने सासरचे दु:खी झाले आहेत. सीमा गेली पण आमच्या चार नातवंडांना परत पाठवा अशी विनंती तिच्या सासूने केली आहेत. सीमा आणि गुलाम हैदरचं 2014 मध्ये लग्न झालं. लग्नानंतर काही वर्षांनी सीमा आणि गुलाम हैदर कराचीमध्या राहायला गेले. कामानिमित्ताने गुलाम हैदर सऊदी अरबला गेला. सीमा कराचीमध्ये मुलांसोबत राहात होती. यादरम्यानच ऑनलाईन गेमदरम्यान सीमा आणि सचिनची ओळख झाली. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर अजून सऊदी अरबमध्येच आहे.