Trending Lions Virla Video : जंगल परिसरातील गावांना नेहमी वाघ, सिंह आणि बिबट्याचा हल्ल्याची भीती असते. बिबट्याचा हल्ल्यात आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहे. वाघ, सिंह आणि बिबट्याचा नाव देखील घेतलं तर आपल्या अंगावर शहारा येतो. शिकारीच्या शोधतात ते माणसांवर हल्ला करतात. गेल्या काही वर्षांमध्ये जंगली प्राण्याचा शहरात शिरल्याची अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशातच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवीत आहे. 


थरकाप उडविणारा व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत आपण शहरामध्ये जंगली प्राण्याचे हल्ले झाल्याचा घटना ऐकल्या आहेत. त्या एकच प्राणी असो कधी तरी अगदी क्वचितच दोन प्राणी शिरल्याची घटना समोर आली असेल. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहेत त्यात शहरामध्ये एक नाही दोन नाही तीनही नाही तब्बल 8 सिंह शहरात फिरताना दिसतं आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता 8 सिंहाचा कळप रात्रीच्या अंधारात शहरात शिरलं आहे. हे सिंह शिकाराच्या शोधात गावात शिरल्याची माहिती वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे. शहरात सिंह वावरतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending video 8 lions entered the city Virla Video on Social media)


कुठलीही आहे घटना?


ही घटना गुजरातमधील एका गावातील आहे. या सिंहाला नागरी वस्तीत फिरताना कसलीही भीती वाटतं नाही आहे. शेवटी तो सिंह आहे राजा तो राजा जंगलात असो किंवा शहरात तो रुबाबानेच फिरणार... पण या अमरेलीमधील रामपर गावामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सध्या हा सिंहाचा कळप नंतर कुठे गेला याची कल्पना नाही. 



अंगावर काटा आणणारा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्वीट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ रीट्विट होतो आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.