Trick to Refill Water From Well: गावाकडल्या विहिरीची ओढ सगळ्यांनाच असते. विहिरीतलं पाणी असं म्हटलं तरी पाण्याची चव आपल्या सगळ्यांच्या जीभेवर रंगाळते. सुट्टी जवळ आली की आपण गावाकडे पळतो. गावाला गेल्यावर विहिरीनं पाणी काढण्याचा आपल्याला अनुभव आहेच. (trending video a man who uses trick to refill the water by using see saw type wooden machine from well)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला माहितीच आहे की विहिरीतून दोरीनं पाणी काढण्याची लोकांना सवय होती आजही कित्येक गावात पाणी काढण्यासाठी दोरीचा वापर केला जातो परंतु आता टेक्नोलॉजी (Technology) इतकी वाढली आहे की आता विहिरीला अनेक ठिकाणी पंप लावले गेले आहेत. 


परंतु जेथे लोकं अजूनही दोरी विहिरीतून पाणी काढतात त्यांना मात्र बरीच मेहनत करावी लागते(Water From Well). पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यातून दोरीनं पाणी काढण्याचा त्रास कमी होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत नव्या जुगाडाची कल्पना आहे जी कदाचित तुम्हीही वापरू शकता.(Viral Video on Social Media)


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लाकडाच्या मोठ्या ओंढक्याला एका व्यक्तीने सिसॉ लावला आहे, या लाकडाच्या एका टोकाला भांड बांधलेलं आहे. जे विहिरीत सहज जाईल आणि या लाकडाच्या दुसऱ्या टोकला एक वजन आहे.
व्हिडीओत दिसणारी व्यक्ती पाणी भरण्यासाठी भांडं खाली टाकते त्या सिसॉद्वारे भांड्यातून पाणी सहज वर येतं. असं केल्यानंतर दोरी पाणी काढण्याचा त्रास लोकांचा कमी होतो. या जुगाडाचा खर्च फार नसून तुम्ही हा व्हिडीओ पाहून तसा जुगाड करू शकता तेव्हा हा व्हिडीओ नीट पाहा आणि तसा लाकडी सिसॉ तुम्हीही बनवून घ्या. तुमतं काम झालंच समजा. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रवीण केसवान आएफएस (Parveen Kaswan, IFS) यांनी शेअर केला आहे. जो राजस्थानातील असण्याची शक्यता आहे. या व्हिडीओत त्यांनी लिहिलंय की ही भौतिकशास्त्राचा वापर करून सोप्या पद्धतीनं विहिरीतून पाणी काढण्याची शक्कल आहे.